Header Ads

संघर्ष यात्रा आणि गोपीनाथ मुंढे

Related image



संघर्ष यात्रा नाव काढल कि डोळ्यापुढे उभे राहतात ते लोकनेते कै. गोपीनाथराव मुंढे. मुंढे आणि संघर्ष हा शब्द तसा लहानपणी पासून जोडला गेलेला. (त्यांना पद्म पुरस्कार द्यायला काहीच हरकत नव्हती) त्यातच त्यांनी संघर्ष यात्रा काढून नेता कसा असावा याच आदर्श उदाहरण राजकारण्यांना घालून दिल. यातून त्यांची समाजाशी असलेली नाळ आणि आपुलकी या दोन्ही गोष्टी हायलाईट होतात. (अर्थात त्यांच्या दोन्ही वारसदारानी याचा जास्त विचार करायला हवा ती गोष्ट वेगळी)

मुंडेच्या याच संघर्ष यात्रेच्या धर्तीवर सध्याला महाराष्ट्रात सर्व विरोधक एकवटून संघर्ष यात्रा काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हि संघर्ष यात्रा संघर्षाने न गाजता अनेक कारणाने गाजते आहे. त्यात प्रामुख्याने विरोधकांची संघर्षयात्रे प्रती म्हणा किवा शेतकऱ्याप्रती असलेला आदरभाव (आपुलकी) हा मुद्दा महत्वाचा वाटतो. अगदी ग्राउंड लेवल पासून नेटीझन्स पर्यंत आढावा घेतला तर विरोधकांच्या संघर्ष यात्रेविषयी खिल्ली उडवली जातेय. अर्थात याच सर्व श्रेय जात ते विरोधकांनाच. कारण स्वार्थासाठी केलेलं काम आणि निस्वार्थीपणे केलेलं काम हे लगेच दिसून येत. अगदी विरोधकांना मोठी संधी हातात असताना हा डाव खेळता आला नाही. याची सुरुवात झाली ती त्यांच्या प्रवासी वाहनाने (एसी बस). त्यांनतर यात्रे दरम्यान असलेला थाट, साध पाणी पिण्याचा वाव आणून बिसलरी पाणी पिणे, जेवणाचा सजलेला टेबल अशा आदि गोष्टी याला कारणीभूत आहेत. थाट करू नका असही माझं म्हणन नाहीये फक्त संघर्ष शब्दाचं महत्व कमी करू नका म्हणजे झाल.

आता संघर्ष यात्रा आणि विरोधक व मुंढे यांच्यातली तफावत, मुंढेनी जेव्हा संघर्ष यात्रा सुरु केली तेव्हा सुरुवात त्यांनी बैलगाडीतून प्रवास करून केली, साध जेवण बांदावरच पाणी असो कि छावणी वर रात्र घालवणे असो. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना आपलसं करून घेतलं, राजकीय दृष्ट्या हा स्वार्थच पण तो त्यांनी यशस्वी जिंकला. कारण मुळात त्यांची नाळ मातीशी जोडली गेली होती. आणि विरोधकांच काय? संघर्ष यात्रेचा अट्टाहास कशासाठी? यातून शेतकऱ्यांना काय फायदा? यातून किती शेतकऱ्यांचे जीव वाचणार आहेत? शेतकऱ्यांची होणारी आबळ विरोधक कायमस्वरूपी थांबवणार आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

विरोधकांनी संघर्ष यात्रा काढावी पण फक्त झगमगाटासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी तळमळीने काढायला हवी होती. मुंढे यांच्या संघर्ष यात्रेचा जरी थोडा अभ्यास केला असता तर विरोधकांच हसू झाल नसत. तसेच राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण देखील झाली असती.


- विजय डोळे

No comments