Header Ads

प्रेम म्हणजे काय असतं?

Image result for prem

प्रेम म्हणजे काय असतं? मोठं-मोठ्या काट्यातही उमलू पाहणार फुल असतं. फुलतानाचा त्याचा संघर्ष तर उमलतानाचा त्याचा मनमोहक सुगंध सर्वाना मंत्रमुग्ध करून जातो. गुलाब असो कि प्रेम क्षणिक वेळेसाठी फुलतेही आणि मस्त स्वार होते या मायावी सुंदर दुनियेत भरकटायला.

न चिंता न फिकीर पुढे काय होणार? पण तरीही तोच उत्साह, तोच उर्मी जगण्याची... त्याच फुलणं हे क्षणिक आहे हे माहिती झालं तरी कोमेजताना तो बिचारा निपचित पडून शांत राहतो. काय माहित कदाचित तो निजतानाचाही जगण्याचा आनंद घेत असेल किंवा आक्रोशाचा तांडवही करत असेल? 

खरं तर हे सर्व माहिती झालं असतं जेव्हा आपल्याला फुलांच्या गावा जाता आलं असतं. म्हणून म्हणतो प्रेमात आणि गुलाबात काय फरक असतो. सर्वाना हवं ते नवं आणि टवटवीत असतं. कोमेजलेल्यांचं काय? ते धडपडतात, संघर्ष करतात, उभे राहतात पुन्हा एकदा मायावी दुनियेत स्वार होण्यास...मस्त भरकटायला...!

- विजय डोळे

No comments