Header Ads

आपली प्रतिमा कशी तयार होते?


 Image result for our personality / image


समाजात आपली प्रतिमा काय आहे? कि आपणच आपली प्रतिमा ठरवून घेतलेली असते किंवा आपण आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत? ही प्रतिमा कशी काय तयार होते? तर ही प्रतिमा आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणातूनच तयार होत असते. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात आहेत त्याचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होत असतो.

कळत-नकळत त्यांचा परिणाम तुमच्या आचरणावर झालेला असतो आणि त्या आपल्यासोबतच मोठ्या होत असतात व आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलेल्या असतात. यामध्ये प्रामुख्याने 'राग' हा सर्वांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. प्रत्येक जण हा काही प्रमाणानंतर त्याला बाहेर काढत असतात तर काही जण क्षणा-क्षणाला बाहेर काढत असतात. अगदी काही शुल्लक टक्केवारीत लोकांचं रागावर नियंत्रण असतं म्हणा किंवा त्यांना रागच येत नाही.

या रागाचं प्रतीक स्मार्टफोनच्या रूपात आपल्याला दिसतं. यामधील अँग्री बर्ड हा बहुतेक लोकांचा एक आवडता गेम आहे. अँग्री म्हणजेच रागावलेला, म्हणजे माणूस हा दोन्ही गोष्टींना चिटकलेलाच आहे. मग तो स्मार्टफोन असू दे किंवा व्यक्ती. राग येणं ही स्वाभाविक गोष्ट असून आपण ती टाळू शकत नाही. पण त्या रागाचा परिमाण आणि राग व्यक्त करण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी मात्र आपल्या हातात असतात. मात्र या गोष्टी आपल्याला शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात शिकवल्या जात नाहीत. याचा परिणाम आपण आपल्या करियरमध्ये भोगत असतो. याचा परिणाम म्हणून कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून 'राग किंवा ताण तणाव नियंत्रण' पुढे येत आहे.

आपण अनेक शैक्षणिक परीक्षा देऊन अनेक टप्पे पार करून नोकरीला लागतो. पण ज्यावेळेस वर्कप्लेसवर काम करण्याची वेळ येते त्यावेळी केलेला अभ्यास आणि आपल्याला करायचे काम यात तफावत असते. अगदी तुमचं अँगर मॅनेजमेंट घ्या. तुम्हाला कधी कोणत्या शिक्षकांनी शिकवलं आहे का कि 'अँगर मॅनेजमेंट' कसं करायचं? यामुळे तुम्ही कितीही शिकलात तरी तुमचं शिक्षण हे अपूर्णच असतं. ज्या स्किलची आवश्यकता असते ते स्किल तुम्ही कॉलेजमध्ये शिकलेले असतात पण ज्या स्किलची गरज असते ते स्किल आपण शिकणे मनावर घेत नाही. त्याचा परिणाम जरी थेट आपल्या करियरवर होत असला तरी आपण ती गोष्ट मनावर घेत नाही.

यामुळे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भीती निर्माण होते. हीच भीती तुम्हाला खाली पहायला लावते. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करायला शिका, आव्हानांना सामोरे जा. यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास वाढीला लागेल. याचा फायदा कठीण समयी तुम्हाला होईल आणि ज्या वेळेला लोक घाबरलेले आणि अस्वस्थ असतील तेव्हा तुम्ही स्वतःमधील संधी शोधण्यात गुंग असाल आणि लोक झोपलेल्या अवस्थेत तुमचा सूर्योदय होईल...!


- विजय डोळे

No comments