Header Ads

ट्रिपल तलाक; भारत आणि अन्य देश

Image result for triple talaq



'ट्रिपल तलाक'वर बंदीचा सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. कुराणने असंवैधानिक ठरवलेली ही पद्धत जगात अनेक कट्टर मुस्लिम राष्ट्रांनी रद्द केली आहे. पण आपल्याकडे आजतागायत ही अघोरी प्रथा चालू होती. 1937 मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या 'शरियत अक्ट'मध्ये ही प्रथा असून भारतात ही प्रथा व्यक्तिगत कायद्यात मोडत होती.

अलीकडच्या काळात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडे ट्रिपल तलाक विषयी तक्रारी वाढू लागल्या. पर्सनल बोर्ड मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष करत होतं. परिणामी काही पीडित महिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटले. यामध्ये आतिया साबरी, इशरत जहाँ, आफरीन रहमान, गुलशन परविन आणि सायरा बानो या हिंमतबाज महिला होत्या. यांना क्रांतिकारी महिला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या महिलांनी गेल्या 3 वर्षांपासून न्यायालयाचे उंबरे झिजवले. शेवटी यांना यश आलं असून सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यावर 6 महिन्याची बंदी घातली आहे. काही प्रमाणात का होईना हा कायदा बंद होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

भारतीय राजकारण व न्यायालयाच्या भूमिकेमुळे या कायद्याविषयी कोणी बोलायला तयार नव्हतं. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात या प्रथेविरोधी तक्रारी आल्या होत्या पण मतदारांच्या गोळाबेरजेपुढे हे सरकार झुकलं होतं. दरम्यान वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं की, तलाक-ए-बिद्दत ही प्रथा मूळ इस्लाममध्ये नाही. 21 इस्लामी देशांनी ही प्रथा रद्द केली असून यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे.

काय आहे 'तलाक-ए-बिद्दत' : 

एकाच वेळी 3 वेळा तलाक बोलण्याच्या प्रथेला तलाक-ए-बिद्दत म्हणतात. ही प्रथा पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर सुरु झाली. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 70 टक्के सुन्नी पंथातील उलेमा याला मान्यता देतात. 1937 मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ अप्लिकेशन अॅक्टच्या सेक्शन 2 मध्ये याविषयी तरतूद आहे. काही तज्ज्ञांच्या मते कुराणात अशा प्रकारची तलाक व्यवस्था नाही. मूळ व्यवस्थेत तलाक बोलण्यासाठी 1 महिन्याचं अंतर असतं. या काळात पती-पत्नीमध्ये समेट होऊ शकतो.

ट्रिपल तलाक कायद्यात बदल करणारे देश : 

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये 1961 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

बांगलादेश : बंगालदेशमध्ये हा कायदा 1985 साली बंद करण्यात आला.

श्रीलंका : श्रीलंकेमध्ये फक्त 10 टक्के मुस्लिम लोक असून देखील येथील कायदा बंद केला आहे.

इराक : सर्वप्रथम इराकने 1959 साली हा कायदा रद्द केला.

अल्जेरिया : या देशामध्ये खऱ्या अर्थाने इस्लाम हा धर्म प्रमुख मनाला जातो. येथे 84-11 1984 या ऍक्ट नुसार 2005 साली या कायद्यावर बंदी आणली गेली.

इजिप्त : लॉ 25 ऑफ 1929 हा कायदा 1985 साली दुरुस्त करण्यात आला. या आधी 1929 साली सर्वप्रथम या देशाने कुराण मधील व्याख्येत बदल करण्याचं धाडस दाखवलं होतं.

युएई : या देशामध्ये 2005 साली हा कायदा रद्दबातल ठरवण्यात आला.

ट्रिपल तलाक कायद्यात बदल करणारे अन्य देश : 

टर्की, सायप्रस, ट्युनिसिया, मलेशियन स्टेट ऑफ सर्वक, इराण, जॉर्डन, इंडोनेशिया, कतार, सुदान, मोरक्को, ब्रुनेई, मलेशिया

उशिराने का होईना पण भारतात हा कायदा बंद होण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयाचं नक्कीच स्वागत करायला हवं.

No comments