Header Ads

पाणपोई


आयुष्याची वाट चालत असताना
रस्त्यात एक पाणपोई लागली..
शांत निरागस सौंदर्याचा जणू तिथे खजानाच होता..
म्हटल थोड थांबाव, विसावा घ्यावा..
हिरवळीवर सावली तशी गारच होती...
बाहेरील गोडव्याप्रमाणे पाणपोईतील पाणीही गोडच होत..
घटकाभर थांबलो पण पाणपोईच्या गोडव्याला भुललो होतो..
डूकली लागतच जाग आली अजून खूप वाट चालायची होती..
पायही निघत नव्हता शेवटी माझाही नावीलाज होता..
पुन्हा पुन्हा पाणी पीत होतो पुढे चाललो तरी पुन्हा माघे फिरत होतो..
पायकाही निघत नव्हता पुन्हा माघे फिरलो
अर्थात पाणी पिण्याचा इरादा नव्हता..
त्या सौंदर्याला भुरळलो होतो शेवटी निघण्याचा निर्धार केलाच
पुढे निघालो तरी फिरून पुन्हा परत येण्याच वचन दिल होत..
आणी पुन्हा  निघालो एकटाच अनवाणी रखरखत्या उन्हात
आयुष्याची भ्रमंती करायला.............


No comments