Header Ads

भ्रष्टाचाररूपी खाऊ

शिक्षण नाही लागत
प्रमाणपत्र नाही लागत
लागत फक्त तोंडच भांडवल
हात जोडा तोंड हलवा
हे झाल प्रक्टीकॅल
मग होते सुरवात
या पक्षात जाऊ कि त्या पक्षात जाऊ
कोणत्या पक्षात सर्वात जास्त खाऊ
सर्वच पक्षात खाऊच खाऊ
वाशिलेबाजित खाऊ
विकासकामात खाऊ
अनुदानात खाऊ
तिकीट वाटपात खाऊ
सगळीकडे खाऊच खाऊ
खाऊ खाऊ यांची ढेरे झाली मोठी
घोटाळे करून केसे पिकली
पिकली तर पिकली अजूनही भेटतोय ना खाऊ
एक मात्र खर आहे
प्रत्येक सरकारच सारखच आहे
त्यावर भ्रष्टाचाराचा ठसा आहे....


No comments