Header Ads

मृदगंध




पहिल्या पावसाचा जो सुगंध असतो ना
त्या सुगंधाप्रमाणे आहेस तू
सतत हवीहवीशी वाटणारी...

त्या क्षणभर सुगंधासाठी जेवढी
जमीन करपली नसेल ना
त्यापेक्षा जास्त करपतोय गं
तुझ्या एका भेटीसाठी मी...

कसलाही विचार न करता तू निघून गेलीस
जाताना तुझ्या मनाची चलबिचल सांगत होतीस तू
ज्या सुगंधासाठी तळमळतोस ना
मुकणार आहेस त्याच सुगंधाला
कारण आता पुन्हा जमीन तापणार नाही
आणि पाऊसही पडणार नाही...

तुझाच

No comments