Header Ads

शेतकरी राजा एकवटतोय पण...



जचा दिवस तसा दुर्दैवी म्हणायला हरकत नाही कारण 1935 (स्वातंत्रपूर्व काळात) नंतर पहिल्यांदा आपल्या विकसनशील (कृषिप्रधान) देशात शेतकऱ्यांना संप करावा लागतोय. तस पाहायला गेलं तर मोदी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे औद्योगिक विकास व आंतराष्ट्रीय बाजारात भारताची प्रतिमा उंचावताना काही प्रमाणात का होईना शेती विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते.

मोदी सरकारचे यश का अपयश हा येथे दुय्यम मुद्दा आहे. कारण आजपर्यंत व उद्याही (जरी सातबारा कोरा झाला तरी) शेती संबंधित समस्या संपल्या नाहीत आणि संपणारही नाहीत. पण मुद्दा हा आहे कि शेतकरी एकवटतोय. जर शेतकरी राजा एकवटतोय तर ही स्वतः त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण शेतकरी एकवटला तर भुरट्या व्यापाऱ्यांपासून व त्यांच्या माजापासून शेतकऱ्याची सुटका होण्यास वेळ लागणार आहे. पण गेल्या काही दिवसापासून  मी या ज्या शेतकऱ्यांच्या संपाच्या बातम्या पाहतो आहे. यात मला शेतकरी कुठेही लाक्षणिक स्वरूपात दिसला नाही हो. दिसला तो फक्त पांढरा 'रंग'. यामागे मोठी राजकीय फळी उभी असून फक्त नाव शेतकऱ्यांचे वापरले जातेय. आणि जे स्वतःला शेतकरी नेता समजतात त्यांची शेतकरी नेता म्हणून राजकीय इतिहास अभ्यासला तर अजून जास्त त्या शंकेत भर पडते.

'लाल रंग' हा आम्हा कामगार कष्टकऱ्यांचा पण सद्यस्थितीला तो 'कॉम्रेड' म्हणून घेण्यापलीकडे काहीच कामाचा उरला  नाही. फक्त सोशली होऊन बसलाय. सोशली विषय निघाला आहेच तर आमचे महाभाग सोशल मीडियावर शेतकरी संप दिन साजरा करतायत. डीपी चेंज करून जर बदल घडला असता तर मी हाच उद्योग करत बसलो असतो. असो, थोडा विषय भरकटला पण हरकत नाही हे मुद्दे पण महत्वाचे होतेच.

आज सकाळी मला एक जनाने विचारले,'सर, शेतकऱ्यांना भाजीपाला का आणून दिला जात नाही. चेकपोस्ट करून का अडवलं जातंय? विचार करायला लावणारा हा प्रश्न होता. त्यासोबतच ही वस्तुस्थिती सुद्धा आहे बरं का. कारण शेतकऱ्यांचे नाव वापरून सरकारला अडचणीत आणण्यासाठी ही मोठी राजकीय गेम आहे. या संपामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण खूपच कमी असून जे शेतकरी या संपात आहेत त्यांना राजकीय मार्गाने या संपात सामील करून घेतले गेलेले आहे.

एवढं लिहून झाल्यावर मुद्दा उपस्थित होतो की, 'माझा या संपाला पाठिंबा आहे की नाही? मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतीत घाम गाळल्याशिवाय पर्याय नसतोच. मी ही माझ्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या घरात जे 'दुष्काळ' असतात ते सर्व 'दुष्काळ' स्वतः अनुभवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख काय असते हे न समजण्या इतका असंवेदनशील नाही. त्यामुळे मी जरी शेतकरी असलो तरी माझा या संपाला पाठिंबा नाही.  शेतकऱ्यांनी घडवून आणलेल्या संपाला माझा पाठिंबा असेल. पुढाऱ्यांनी नाही...

- विजय डोळे, अहमदनगर

No comments