Header Ads

काय फरक पडतो?

रोहित हा कोणत्या जतिचा होता, समाज व राजकीय तथाकथीय यामागील खरे गुन्हेगार आहेत. आजही समाजात रोहित सारखे हजरो लाखो जण या व्यवस्थेचे बळी आहेत.. या मगील खरे कारण शोधयचे झाले तर प्रतिष्ठा व सत्ता हे दिसून येइल.. प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य व मागासवर्गीयांची गळचेपी चाललेली दिसून येत आहे. अगदी पहायच झाल तर मध्यमामध्ये ही हा प्रकार सर्रास चललेला दिसून येतो. बाकी क्षेत्राच तर विचारायलाच नको. का सर्वसामान्यानाही जीवन असतं हे तथाकथीत प्रतिष्ठाितांना अजुनही मान्य नाही. जीवन जगण्याचा अधिकार अम्हालाही आहे. आज रोहित आहे उद्या मी असु शकतो.बाबासाहेबानी घटना लिहली ती फक्त कगदापुर्तीच मर्यादित आहे का? गरज आहे खरा इतिहास पुढे येण्याची. तरुणपिढीला खरा इतिहास जो पर्यंत कळत नाही तो पर्यन्त सर्वसामान्य हा गुलामगिरी मध्ये अडकून राहणार आहे. एकच सांगतो आहे , तथाकथीताना आम्ही झोपलो नाहीत. आमच्या सहनशक्तिचा अंत पाहु नका. विसरु नका ज्या ठिकाणी शिवाजी महाराज, डाॅ. अंबेडकर, शाहु-फुले जन्मले आहेत त्याच मातित अमचा जन्म झलेला आहे.

No comments