Header Ads

विकासाच्या दृष्टीने विचार करा


ज्याला दोन वेळेच्या जेवनाची भ्रांत आहे, ज्याला इतभर कापड घालायाला नाहीत, देशातील पिडित लेकी बाळीला, येथील दगडांना, मातीला, झाडांना, नद्याना विचारा देशद्रोही कोण आहे ते??
राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेण्यासाठी अनुकूल परस्थिती निर्माण करतात आणि त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य.. कोणा एका पक्षाला दोष देऊन उपयोग नाही…. आपण विचार करायला पाहिजे.. चांगल काय?वाईट काय? हा विचार करुन आपल स्वतःच मत केल पाहिजे. जो पर्यन्त जनता विचार करणार नाही तोपर्यंत हे राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेत राहणार. पण एकदाका हा सर्वसामान्य (coman man) विचार करायला लागला तर राजकीय पक्ष व नेतेमंडळी यांना त्यांची ध्येय धोरण बदलल्या शिवाय गत्यंतर नाही..
कारण एकंदरीत मागील काही घटनंचा अभ्यास केला तर असा निष्कर्ष पुढे येतो की जो काही जातीय व धार्मीक कलह चलला आहे, यावर तोडगा काढण्याच्या ऐवजी अधिकाधिक चिघळत जताना दिसतोय आणि विरोधी पक्ष याच गोष्टीसाठी टपुन असतात मग तो कोणताही विरोधी पक्ष असो तो फक्त स्वतःच्या फयद्याचा विचार करतो.
एकंदरीत सांगन्याचा उद्देश् हाच की सर्वसामान्यनी स्वतः विचार करावा देशभरातील सर्व समस्या निर्माण झाल्यात , देशात विकासाला गती मिळावी आणि आपण विकसनशील पासुन आपली गनणा विकसीत देश म्हणून व्हावी. नेत्याला निवडून दिलं की जनतेची जबाबदारी संपत नाही, विकास होतोय की नाही हे जनतेने बघायला पाहीजे किंबवना राजकारण्यांकडून विकासाची कामे करवून घेतली पाहीजेत.
भारतातील 50% लोकांना जात धर्म यांच काही घेन देन नाही. ते एकवेळेस स्वताच पोट भरु शकत नाहीत त्यांना काय करायचय कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त…..



No comments