Header Ads

नवी दिशा, सोशल मीडिया...!


Image result for new media



जच्या महाराष्ट्र टाइम्स मधील साप्ताहिक लाईक अनलाईक सदरातील श्रीरंजन दादाचा 'सोशल मीडियाचा सवतासुभा' हा लेख वाचला. (तसा दर आठवड्याला वाचतच असतो) श्रीरंजन दादा तसा डावा पण त्याचं लिखाण नेहमी तटस्थ आणि वाचनीय. सदर लेख हा मेनस्ट्रीम मीडिया वि. सोशल मीडिया असला तरी हा मी थोडा वेगळ्या अंगाने घेईन.

आज बहुतेक सर्वांच्या हातात मोबाईल आहे? मोबाईल आहे म्हटलं तर व्हाट्स अप, फेसबुक नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. सोशल मीडिया मुळे प्रत्येकजण काही क्षणात अपडेट होतो आहे. यात सर्वात मोठा वाटा आहे तो देशात झालेल्या मोबाईल क्रांतीचा. त्यात होऊ घातलेल्या पत्रकारांसाठी तर हि पर्वणीच कारण नवीन पत्रकारांची पिढी जरा जास्तच स्वाभिमानी आहे. म्हणजे कसं तर एकतर नवीन (शिकाऊ) पत्रकारांना संधी भेटत नाही. भेटली तरी यांना ते वातावरण झेपत नाही (थोडक्यात पुढे-पुढे करायची सवय नसते). माध्यमांच्या व्यावसायीकरणामुळे 'बॉसगिरी' वाढली व वाढत्या 'बॉसगिरी' मुळे 'मी म्हणेन तीच पूर्व दिशा' हि संस्कृती मोठ्याप्रमाणात रुजली. याला अपवाद न्यू मीडिया (डिजिटल) असला तरी काही प्रमाणात 'बॉसगिरी' असतेच आणि ती असायलाच पाहिजे.

मला सांगायचंय एवढंच कि, या 'बॉसगिरी' संस्कृतीत काम करायची इच्छा नसणाऱ्या माध्यमातील नवीन असलेल्या शिकाऊना हा सोशल मीडिया मोठा वरदान आहे. आज सगळीकडे मायक्रो ब्लॉगिंगचा (ट्विटर) बोलबाला आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरील निम्म्याहून अधिक बातम्या येथूनच भेटतात. व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यम उपलब्ध आहेत. जस कि, फेसबुक, ब्लॉगर, वेबपोर्टल हि महत्वाची ठिकाण आहेत. आज पाहायला गेलं तर मराठीत व्यक्त होण्यासारखी अनेक चांगली पोर्टल्स उपलब्ध आहेत किंवा स्वतःचा ब्लॉग काढू शकता. इंग्रजीमधील वेब पोर्टल असलेलं स्क्रोल.कॉम आज जगभरात आघाडी घेतंय. अनेक महत्वाचे आणि नाजूक विषय हाताळले जातायत आणि लोकांनासुद्धा ते भावतात. व्यक्त होता येत असलं तरी रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होतो? तोही इथेच सोडवला जाऊ शकतो. गरज आहे ते तंत्र जाणून घ्यायची. म्हणूनच पारंपरिक माध्यमांना फाटा देऊन डिजिटल मध्ये सुद्धा मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

श्रीरंजन दादाने उल्लेखल्या प्रमाणे 'तुम्ही आमच्या बातम्या नका छापू, आम्ही आमच्या मागण्या मांडू सोशल मीडियावर. पोस्ट, ट्विट, लाईव्ह, ब्रॉडकास्ट... काय वाट्टेल ते करू. याप्रमाणे आपलं सरकार देखील डिजिटल होऊ पाहतंय. सुषमा स्वराजांचं उदाहरण घ्या, देशवासीयांच्या अनेक समस्या त्या ट्विटरवरूनच सोडवतात. यावरून डिजिटल मीडिया किती पॉवरफुल आहे हे दिसून येते. सरतेशेवटी कोणत्याही माध्यमांचा वापर हा आपण करण्यावरून त्याचा परिणाम ठरत असतो. म्हणूनच मी म्हणेन कि, गो विथ डिजिटल बट विथ केअर...

-- विजय विष्णू डोळे



No comments