Header Ads

जानदार 'बेगम जान'


Image result for begum jaan hd

दिग्दर्शक : श्रीजीत मुखर्जी

कलाकार : विद्या बालन, इला अरुण, गौहर खान, पल्लवी शारदा, सुमित निझावन, नसीरुद्दीन शाह, राजेश शर्मा, विवेक मुश्रान, चंकी पांडे

अनेक अडथळे पार पाडत अखेर 'बेगम जान' प्रदर्शित झालाय. 'बेगम जान' हा श्रीजीत मुखर्जी यांचा 'राजकाहिनी' या नॅशनल अवॉर्ड जिंकलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. यातील कथानक हे ऑगस्ट 1947 मधील भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बंगालच्या एका कोठीत राहणाऱ्या 11 महिलांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेवर आधारित आहे.


कथा : ही कथा आहे देश स्वतंत्र झाल्याच्या काळातील भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यानची. या कथानकात संपूर्ण कथा फिरते ती बेगम जान व तिच्या कोठी भोवती. कारण भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान रेडक्लिफ लाईन ही तिच्या कोठीच्या मधोमध जात असते. अशातच कोठी खाली करण्याचे सरकारी आदेश बेगमला येतात पण बेगम हा आदेश साफ धुडकावून लावते. मग यातूनच कोठी व कोठीमधील 12 जणांचा संघर्ष सुरु होतो. एकीकडे सरकारी व राजकारणी षडयंत्र व दुसरीकडे बेगम व कोठीतील बाकीच्यांचा कोठी वाचवण्याचा संघर्षातून कथा वेगळे वळण घेते. मात्र ते पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.

अभियन : या सिनेमात सर्वांनीच तोडीचा अभिनय केला असून बेगम जानची भूमिका विद्या बालनने अत्यंत चोखपणे निभावलीय. तर यामध्ये सुत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चन यांचा आवाज भाव खाऊन जातो.

संगीत : सिनेमाचं संगीत अतिशय श्रवणीय असून सिनेमाचं बॅकग्राउंड म्युझिक मंत्रमुग्ध करून टाकते. आशा भोसलेंनी गायलेले 'प्रेम में तोहरे', अरिजीत सिंह आणि श्रेया घोषालचे 'सुबह' हे गाणं विशेष उल्लेखनीय आहे.

सिनेमाचे दिग्दर्शन चांगले झाले असून यासोबत सिनेमॅटोग्राफी उत्तम झालीय. एकंदरीतच काय तर हा सिनेमा सहकुटुंब पाहण्याजोगा असून, व्यवस्थेवर मारलेला आसूड नक्कीच पाहण्यासारखा आहे. बाकी तुमची मर्जी!

- विजय डोळे

No comments