Header Ads

बदलेकी आग : मातृ - द मदर



Image result for maatr the mother hd poster


निर्माता - मायकल पैलिको

दिग्दर्शक - अश्तर सईद

कलाकार - रवीना टंडन, दिव्या जगदाळे, मधुर मित्तल, अलिशा खान, रशद राणा, शैलेंद्र गोयल, अनुराग अरोरा

अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री रवीना टंडनने  मातृ- द मदरया सिनेमाद्वारे पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. हा सिनेमा अश्तर सईद यांनी दिग्दर्शित केला असून महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कथा भाष्य करते.

कथा : या सिनेमाची कथा विद्या चौहान (रवीना टंडन) टिया (अलिशा खान) या दोन मायलेकींच्या भोवती फिरते. विद्या ही स्कुल टीचर असते. एके दिवशी टियाच्या शाळेत कार्यक्रम असतो. टिया व विद्या मायलेकी या कार्यक्रमाला जातात. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेले असतात. मुख्यमंत्र्यांचा मुलगाही या कार्यक्रमाला आलेला असतो. रात्री उशिरा कार्यक्रम संपतो व विद्या घरी जायला निघते. रस्त्यात खूप ट्रॉफिक असल्याने विद्या दुसऱ्या रस्त्याने निघते व या दोघींचा पाठलाग मुख्यमंत्र्यांचा मुलगा व त्याचे मित्र करत असतात. एका सुमसान जागेवरती मायलेकींनी अडवले जाते व त्यांच्यावर गॅंगरेप होतो यात टियाचा दुर्दैवी अंत होतो. या सर्व घटनेविरुद्ध विद्या तिच्या मैत्रिणीची मदत घेऊन न्याय मागते पण तिला न्याय मिळत नाही. मग इथून खरी कहाणी सुरु होते, ती तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहावी लागेल.

अभिनय : अनेक वर्षानंतर रविना टंडनने जबरदस्त पुनरागमन केले आहे. तिने तिच्या पात्राला पूर्ण न्याय दिला असून दिव्या जगदाळे, मधुर मित्तल, अलिशा खान, रशद राणा, शैलेंद्र गोयल, अनुराग अरोरा यांचाही अभिनय वाखाणण्याजोगा आहे.

सुरुवातीला सिनेमा जरा स्लो वाटत असला तरी मध्यंतरानंतर सिनेमा एक वेगळे वळण घेतो. सिनेमात फार काही वेगळे नसले तरी रविनाचा अभिनय, तिची व्यवस्थेविरुद्ध लढाई व न्यायासाठी उचललेले पाऊल यासाठी हा सिनेमा नक्की पहायला पाहिजे...!

- विजय डोळे

No comments