Header Ads

नगर आणि सांस्कृतिक 'तहान'

Image may contain: 2 people, people standing


संदीप दंडवते लिखित आणि दिग्दर्शित 'माईक'ने महाराष्ट्रातील कलारसिकांच्या व पुरस्कारांच्या मनात घर केलंय, या यशाची चव चाखण्यात गुंग होतील आणि एवढ्यावर थांबतील ते कलाकार कसले? यशाचा कसलाही गर्व न करता, नव-नवीन प्रयोग करत व आपल्या कामात सुधारणा करत हि मंडळी पुन्हा 'फाउंडेशनच्या बेसमेंट्ला' या नव्या प्रयोगासह मैदान गाजवायला उतरली आहे.

दुर्लक्षित आणि माणूस जातीतून हद्दपार अशा 'हिजडा' संस्कृतीविषयी या एकांकिकेमध्ये हाथ घातला आहे. सहसा पाहायला गेलं तर 'हिजडा' हा विषय आपल्याकडं शिवी, उपभोग आणि हासी-मजाक एवढाच मर्यादित आहे. यापलीकडे जाऊन त्यांचं दुखणं काय आहे? त्यांच्या भावना काय आहेत याला आपल्या समाजात कवडीमोल किंमत आहे. यामुळे हा विषय एकांकिका म्हणून घेणं आणि त्याच सादरीकरण करणं, फक्त सादरीकरण मी म्हणणार नाही तर दर्जेदार आणि यशस्वी सादरीकरण या टीमने केलं आहे. नाटकाविषयीच्या तांत्रिक गोष्टी माहिती नसल्याने मी जास्त बोलणार नाही. मात्र या एकांकिकेची विषय निवड, सादरीकरण, दिग्दर्शन आणि विशेष म्हणजे अभिनय उच्च दर्जाचा होता.

विराज, कृष्णा, अमित यांचा अभिनय दिवसेंदिवस खुलत चाललंय, संदीप दंडवते सारखा लेखक, दिग्दर्शक मोठ्या जिद्दीने उभा राहतोय हे आम्हा नगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर आम्हा नगरकरांसाठी 2017 साल ऐतिहासिक आणि पुढील अनेक दशके प्रोत्साहन देणारे ठरले. याचे अनेक दाखले देता येतील मात्र सांस्कृतिक दृष्ट्या पाहायला गेलं तर अंजली गायकवाड, महेश काळे, शरद जाधव, पूर्णानंद, आदेश आवारे, कृष्णा वाकळे, विराज अवचित्ते, संदीप दंडवते, अर्चना खरपुडे, हरीश बारस्कर आणि अशा अनेक उगवत्या सिताऱ्यांची फौज आमच्या नगरच्या मातीत तयार होत आहे हे सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. त्याच कारणही तसेच आहे कारण गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यातील सांस्कृतिक तहान वाढत चालली आहे.

नगरमधील सांस्कृतिक क्षेत्राचा वाढता आलेख पाहता येणारा काळ हा फक्त नगरकरांचा असेल यात तिळमात्र शंका नाही. आणि याच सर्व श्रेय असेल ते न्यू आर्टस् कॉलेजमधील 'मास कम्युनिकेशन' विभाग आणि याच विभागाकडून आयोजित 'प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव', अहमदनगर महाकरंडक, अक्षर करंडक, नरेंद्र फिरोदिया, बलभीम पठारे आणि जिल्ह्यातील दशकोनदशके रंगणाऱ्या जेष्ठ रंगकर्मी यांचं व यांना भरभरून प्रेम देणाऱ्या माय-बाप प्रेक्षकांचं...

- विजय डोळे
9890740042

2 comments: